विधानसभेसाठी सदाभाऊ खोत यांची ‘या’ मतदारसंघातून तयारी सुरु !

विधानसभेसाठी सदाभाऊ खोत यांची ‘या’ मतदारसंघातून तयारी सुरु !

सांगली – लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या चार ते पाच महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री असलेले सदाभाऊ खोतही निवडणूकीच्या तयारीला लागले असल्याचं दिसत आहे. वाळवा विधानसभा हा मतदारसंघ रयत क्रांती संघटनेला मिळावा यासाठी, मी लोकसभेसाठी तयारी केली होती
आणि जर विधानसभेसाठी हा मतदारसंघ दिला तर निश्चितपणाने या मतदारसंघातून माझी निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, तसेतटच तयारी देखील असल्याचं मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या मतदारसंघात संपर्क दौरा करणार असून लोकांची मत जानून घेणार असल्याचं सदाभाऊंनी म्हटलं आहे. लोकसभेची मी या आधी तैयारी केली होती, या मतदारसंघात विकासाची कामे मी केली आहेत, लोकांच्यातुन जे नाव ठरेल ते नाव मुख्यमंत्र्यांकडे पाठवले जाईल असही मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला वाळवा विधानसभा मतदारसंघ भाजपनं सोडला तर या मतदारसंघातून सदाभाऊ खोत निवडणूक लढवतील असं दिसून येत आहे.

तसेच राज्यात मोठा दुष्काळ पहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने ठिकठिकाणी चारा छावण्या उभारल्या आहेत. त्याचबरोबर शेळ्या मेंढ्यांसाठीही चारा छावण्या दिल्या जाणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. दुष्काळी भागातील इतर जनावरांच्या प्रमाणे, शेळ्या मेंढ़या चारा छावणीत ठेवून त्यांना चारा देण्याची मागणी पुढे आली तर शेळ्या मेंढ़यांसाठी सुद्धा चारा छावणी दिली जाणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

COMMENTS