सांगली – घार उडे आकाशी तिचे चित्त पिलापाशी या वचनाप्रमाणे नामदार सदाभाऊ खोत यांनी मूळ गावात अखंड हरिनाम सप्ताहात सहभाग घेतला असल्याचं पहावयास मिळालं आहे. हातात टाळ घेऊन हरी नामाचा गजर करत सदाभाऊ खोत यांनी गेली अनेक वर्षांपासून सुरु असलेली वडिलांची परंपरा कायम ठेवली आहे. सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर या मुळ गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहात सदाभाऊ लहानपणापासून सहभाग घेतात. यावेळेसही मंत्रिपदाचा भार सांभाळत त्यांनी नेहमीच्याच उत्साहात किर्तन आणि प्रवचनात सहभाग घेतला होता.
जवळपास चार दशके चळवळीत वाढलेल्या या शेतकरी नेत्याला ग्रामीण जीवनाची आणि आध्यात्माची ओढ असल्याचं यामधून दिसत आहे. यावेळेस सदाभाऊ खोत यांनी आपल्या गावक-यांना समोर मंत्री आहे याची जाणीव करून न देता आपण सामान्य आहोत ही विचारधारा जवळ बाळगली असल्याचं दिसून आलं आहे. मंत्रीपदातून सामान्य माणसाला ताकद मिळाली पाहिजे यासाठी आजारपणावर मात करत “चाल गड्या चाल भीती कुणाची ना पर्वा कुणाची” या मार्गावर मरळनाथपुरचे सदाभाऊ विकासाचा गजर करत असल्याची भावना त्यांच्या गावक-यांमध्ये आहे.
COMMENTS