मुंबई – गेली दीड ते दोन महिन्यांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. यासंदर्भात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंत्रालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्यातील काही शेतकरी आणि अधिकारी उपस्थित आहे. या बैठकीमध्ये कांद्याचे दर का घसरत आहेत. त्यामागची कारणे आणि यावर तोडगा काढण्याबाबत चर्चा केली जात आहे. तसेच यावर तोडगा काढण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहवाल पाठवण्यात येणार आहे.
दरम्यान कांदा पिकावर मोठा खर्च करुन कांद्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे राज्यातील शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. गेली दीड ते दोन महिन्यांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पिकासाठी केलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बैठक बोलावली आहे.
COMMENTS