सातारा – नामदार सदाभाऊ खोत यांनी आज माण तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तालुक्यातील दिवड व भाटकी गावात पाणी फाऊंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत श्रमदान केले. यावेळी सदाभाऊंनी दिवड आणि भाटकीमध्ये श्रमदान केले. यावेळी गावातील नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. महिला वर्ग तसेच लहान मुले अतिशय चिकाटीने श्रमदान करताना यावेळी दिसून आहे.
दरम्यान यावेळी सदाभाऊंनी या गावांचा वॉटरकप स्पर्धा २०१८ मध्ये क्रमांक येण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी वर्गणी दिली त्या सर्वांचे कौतुक केले. यावेळी मा. भास्कर नाना कदम (संजय गांधी निराधार योजना वाळवा तालुका अध्यक्ष), मा. बाळासाहेब मासाळ (भाजपा तालुका अध्यक्ष, माण), मा. समीर जाधव (युवानेते), मा. विठ्ठल विरकर, मा. रामचंद्र सावंत (सरपंच ग्राम. दिवड), मा. विश्वांबर बाबर, मा. अशोक सावंत, मा. बाळू कोडलकर (भाटकी ग्राम. सरपंच), मा. नवनाथ शिर्के, मा. दत्तात्रय शिर्के तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.
COMMENTS