मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि चित्रपट निर्माते सदानंद उर्फ पप्पू लाड यांनी आत्महत्या केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते. ग्रॅंट रोड परिसरातील गणपती मंदिरात बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पप्पू लाड यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पप्पू लाड यांनी 15 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. पप्पू लाड यांनी मराठी आणि काही भोजपुरी चित्रपटांची निर्मिती केली.
दरम्यान पप्पू लाड यांनी निर्मिती केलेला ‘देहांत’ हा चित्रपट विशेष गाजला होता. या चित्रपटाचं लेखन प्रदीप म्हापसेकर यांनी केले होते, तर प्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे यांनी या चित्रपटात काम केले होते.प्रत्येक चित्रपटाचा पहिला सीन ग्रँड रोड येथील त्यांनी बांधलेल्या लाडाच्या गणपती मंदिरातीलच असावा, असा पप्पू लाड यांचा आग्रह असायचा.
COMMENTS