पुणे – राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांना बारामतीच्या जागेवरून टोला लगावला आहे. बारामती निधानसभेच्या वेळेस मी बारामतीत तळ ठोकणार आहे, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर चंद्रकांतदादा, बारामतीत कसला तळ ठोकून बसता येत्या २३ मे रोजी भाजपचाच तळ उद्ध्वस्त होणार, असल्याचं सक्षणा यांनी चंद्रकांत पाटलांना म्हटलं आहे.
"चंद्रकांतदादा, बारामतीत कसला तळ ठोकून बसता येत्या २३ मे रोजी भाजपचाच तळ उद्ध्वस्त होणार आहे," राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांचा चंद्रकांत पाटील (@ChDadaPatil ) यांना टोला.@SakshnaSalgar pic.twitter.com/AAP1gulPdc
— NCP (@NCPspeaks) May 16, 2019
दरम्यान बारामती निधानसभेच्या वेळेस मी बारामतीत तळ ठोकणार आहे, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावर सक्षणा यांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.काम काही नाही. स्वत:चं कर्तृत्व काही नाही. मोठ्या लोकांवर टीका करायची आणि मोठं व्हायचं, तसेच तुमच्या कमळाच्या पाकळ्या कुठे कुठे विखुरणार आहेत. तेवढं तुम्ही बघा, असंही सक्षणा यांनी चंद्रकांत पाटलांना म्हटलं आहे.
COMMENTS