नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं काल पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आता समाजवादी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्यासह सहा जणांचा समावेश आहे. बदायू मतदारसंघातून धर्मेंद्र यादव, फिरोजाबादमधून अक्षय यादव, बहराईचमधून शब्बीर वाल्मिकी, रॉबर्टसगंजमधून भाईलाल कोल, इटावातून कमलेश कठेरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान मुलायमसिंह यादव यांना मैनपुरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून ते आझमगढचे विद्यमान खासदार आहेत. २०१४ मध्ये त्यांनी आझमगढ आणि मैनपूरी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या दोन्ही ठिकाणी ते विजयी झाले होते. ‘सपा’कडून दुसरीही यादी लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे. दुस-या यादीत अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यांना कन्नौजमधून पुन्हा उमेदवारी मिळू शकते. तर लखीमपूर येथून राज्यसभा खासदार रवि वर्मा यांची कन्या पूर्वी वर्मा आणि हरदोईमधून उषा वर्मा यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
Samajwadi Party releases first list of 6 candidates for Lok Sabha polls. Mulayam Singh Yadav to contest from Mainpuri. pic.twitter.com/KUiQdNIOjR
— ANI UP (@ANINewsUP) March 8, 2019
COMMENTS