मुंबई : मुंबईतल्या लालबाग इथे होणारं शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांचं व्याख्यान रद्द करण्यात आलं असून ते पुढे ढकलण्यात आलं आहे. सध्याचं वातावरण पाहता शिवप्रतिष्ठाननं हा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी हे व्याख्यान रद्द करण्याची मागणी केली होती. हे व्याख्यानं नंतर घेतलं जाणार असून याबाबतची माहिती कळवली जाईल असं शिव प्रतिष्ठाननं म्हटलं आहे.
भीमा कोरेगाव येथे झालेल्या प्रकरणानंतर भिडे गुरुंजींना अटक करण्याची मागणी दलित संघटनांकडून केली जात आहे. परंतु या प्रकरणाचे सर्व आरोप भिडे गुरुजींनी फेटाळून लावले आहेत. तसेच बामसेफ, संभाजी ब्रिगेड या संघटनांबरोबरच पुण्यात कार्यक्रम झालेल्या इतर संघटना या घटनांमागे असल्याचं शिव प्रतिष्ठाननं म्हटलं आहे. तसेच पुढील काळात तपास कार्यात पोलिसांना आमचे पूर्ण सहकार्य असेल असही शिव प्रतिष्ठाननं म्हटलं आहे.
COMMENTS