भीमा कोरेगाव प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही –संभाजी भिडे

भीमा कोरेगाव प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही –संभाजी भिडे

सांगली – भीमा कोरेगाव प्रकरणाशी आमचा काही संबध नसून आम्ही असला आगलावेपणा कधी आयुष्यात केला नाही. हे प्रकरण आमच्या आंगाशी चिटकवून राजकारण साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केलं आहे. भीमा कोरगाव प्रकरणाबाबत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली जात आहे.

दरम्यान फार मोठा हेतु धरून मोठा बनाव करण्याचं कारस्तान केलं असल्याचंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.तसेच देशातील वातावरण बिघडवण्याचा आणि त्याचा राजकीय फायदा मिळवण्यासाठी हा बनाव केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या घटनेशी आपला काहीही संबंध नसून विनाकारण माझ्यावर गुन्हा दाखल करुन बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं संभाजी भिडे म्हणाले आहेत. तसेच त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.

COMMENTS