“मिलिंद एकबोटेंना तात्काळ अटक करा अन्यथा फरार घोषित करा !”

“मिलिंद एकबोटेंना तात्काळ अटक करा अन्यथा फरार घोषित करा !”

पुणे – मिलिंद एकबोटेंना तात्काळ अटक करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांची भेट घेतली आहे.. पुणे पोलिसांनी मिलींद एकबोटेंना तात्काळ अटक करावी, अन्यथा सापडत नसेल तर ‘फरारी घोषीत करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान भीमा कोरेगावातील घटनेप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेला अनेक दिवस होऊन गेले तरी मिलिंद एकबोटेंना अजून अटक केली नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेतली आहे. तसेच एकबोटेंना तात्काळ अटक करा अन्यथा त्यांना फरार घोषित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

COMMENTS