पुणे – मंजर येथील संभाजी ब्रिगेडचे प्रचारक शरद पोखरकर यांना मारहाण करणाऱ्या बजरंग दलाच्या सर्व कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. पुणे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना निवेदनाव्दारे संभाजी ब्रिगेडनं ही मागणी केली असून यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल तुळवे, सचिव प्रमोद गोतारणे, पिं.ची. शहर कार्याध्यक्ष सतिश काळे, संघटक सुधीर पुंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान संभाजी ब्रिगेडनं जिल्हाधिका-यांना निवेदन केलं आहे. यामध्ये त्यांनी पोखरकर हे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा सांगतात. ‘शिवजयंती’ सगळीकडे साजरी झाली पाहिजे यासाठी 3 ते 4 वर्ष सातत्याने प्रचार करीत होते. म्हणून आकसाने शरद पोखरकर यांच्यावर घरात घुसून हल्ला करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त प्रबोधनासाठी शाळेतील मुलांना कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक वाटण्यात आले. याचा राग धरून बजरंग दलाच्या ५० लोकांनी त्यांना मारहाण केली असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे. तसेच या गावगुंडाना तात्काळ अटक करून सखोल चौकशी करावी. कारण यांच्याकडून बरीच माहिती मिळेल. याच लोकांचा भिमा कोरेगाव दंगलीशी सुद्धा संबंध असावा असे वाटते असंही संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे.
COMMENTS