मुंबई – भीमा कोरेगाव प्रकरणाची संपूर्ण चौकशी सीबीआयकडे सोपवावी तसेच यामागचा मास्टरमाईंड शोधून काढण्याची मागणी महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांच्या सह प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. डॉ. भानुसे म्हणाले की, भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाला २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शहीद स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो बहुजन बांधव तेथे एकत्र झालेले होते. त्याठिकाणी काही विकृत प्रवृत्तीच्या काही समाज कंठकांनी अनेक दिवसांपासून जाणीवपूर्वक षडयंत्र रचून १ जानेवारीच्या कार्यक्रमावर जो हल्ला केला, शेड पाडले. त्यांचा संभाजी ब्रिगेड जाहीर निषेध करीत आहे.
तसेच दलित, मराठा व सर्वच बहुजन समाज बांधवांनी या विकृत घटनेचा शांतपणे निषेध करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. या घटनेमागे जो मास्टरमाईंड आहे त्याचा पोलिसांनी आधी शोध घेऊन त्याचे नाव जनतेसमोर जाहीर करावे. तसेच जो दोन समाजात तेड निर्माण करीत आहे. त्या मास्टरमाईंडला शोधून काढण्यासाठी लक्ष केंद्रीत करावे व शांतता राखावी असे आवाहन महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केलं आहे.
COMMENTS