पुणे – औरंगाबादमध्ये मराठा समाजाच्या तरुणानं आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी ‘संभाजी ब्रिगेड’ व इतर मराठा संघटनाच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरू आहेत. राज्य सरकार आरक्षण प्रश्नावर समाजाला फसवत आहे. म्हणून महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली आहे. भाजप व फडणवीस सरकारला सत्तेवर रहायचा अधिकार नाही. खोटारड्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे.
दरम्यान आज काकासाहेब शिंदे यांनी गंगापुर येथील कायगाव येथे गोदावरी नदीच्या पात्रात जल समाधी घेतली.पोलीस व प्रशासन’च्या ढिसाळ नियोजनामुळे मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झाला. हा सरकारच्या गलथान व खोटारड्या व्यवस्थेने केलेला खुन आहे. म्हणून काकासाहेब शिंदे (गंगापुर) यांच्या आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी ‘संभाजी ब्रिगेड’नं केली आहे.
COMMENTS