पुणे शहरातील सर्व रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ करण्यास विरोध -संभाजी ब्रिगेड

पुणे शहरातील सर्व रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ करण्यास विरोध -संभाजी ब्रिगेड

पुणे – शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असले तरीही मेट्रो प्रकल्पा लगत ‘पे अँड पार्क’ करण्याचा प्रयत्न होणार आहे. परंतु केंद्र सरकार व राज्य सरकारने पार्किंग पॉलिसीबाबत असे कधीही जाहीर केलेले नाही. अथवा टेंडरमध्येही तशी तरतूद नसावी. त्यामुळे हा झिजीय कर असून पुणेकरांच्या माथी मारला जात असल्याचं संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे. त्यामुळे पुण्यामध्ये पे अँड पार्कला आमचा विरोध असल्याचं संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे.

दरम्यान स्मार्ट सिटी म्हणवून घेणाऱ्या पुण्यात पुणेकर वाहतूक कोंडीने आगोदरच हैराण आहेत, रस्त्याची अवस्था पाहता सर्व रस्ते खड्ड्यात आहेत. रस्त्याची चाळण झालेली आहे. त्यामुळे टॅक्सरूपी जनतेचा पैसा चांगल्या कामाला महत्त्व देण्याची मागणीही संभाजी ब्रिगेडनं केली आहे. तसेच वाढत्या महागाईने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे दैनंदिन कामासाठी फिरणाऱ्यांना पे अँड पार्क’ चा झिजीया कर महानगरपालिकेने लादू नये. याला संभाजी ब्रिगेडचा विरोध असल्याचं पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS