पुणे – दरवर्षी जगतगुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुण्यात येते. या पालखीत हजारों वारकरी व भक्त मंडळी सहभागी होत असतात. संपूर्ण वातावरण भक्तीमय रसात फुलून गेलेले असते. परंतु मनोहर भिडेंचे लोक तलवारी घेऊन वारकऱ्यांमध्ये घुसतात. त्यामुळे वारकरी व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त व पोलीस प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन भिडेंच्या लोकांना ‘तलवारी व काठ्या’सह’ पालखी मार्गापासून दुर ठेवावे. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांना वारीत घुसू देऊ नये. पोलिसांनी त्यांना प्रतिबंध करुन वारीत परवानगी देऊ नये. तसेच भिडें यांच्याकडून सतत सामाजिक वातावरण गढूळ करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. १ जाने. २०१८ रोजी ते स्पष्ट ही झाले असून यांच्या या कृत्यामुळे घातपात होऊ नयेत याची पोलिसांनी दक्षता घ्यावी अशी मागणी ‘संभाजी ब्रिगेडनं केली आहे.
COMMENTS