पुणे – पुण्यातील सनबर्न फेस्टिव्लला संभाजी ब्रिगेडनं विरोध केला आहे. सनबर्न फेस्टिव्हल’ हा दारूड्या संस्कृतीचा व आमली पदार्थांचा खुला बाजार आहे. हा सरकार पुरस्कृत अश्लिल पाश्चात्य संस्कृतीचा नंगानाच आहे. समाजविघातक सनबर्न फेस्टिव्हल दि. २९ ते ३१ डिसेंबर २०१८ रोजी बावधान, पुणे येथे होणार आहे. आम्ही खपवून घेणार नसल्याची भूमिका संभाजी ब्रिगेडनं घेतली आहे.
दरम्यान सनबर्न फेस्टिव्हल’ला वेळेची मर्यादा नसते. मात्र शिवजयंती, दहिहंडी, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव काळात कायद्याचा बडगा दाखवून रात्री १० वा. बंद केले जातात. मात्र सनबर्न फेस्टिव्हलला आर्थिक गणिते बघून रात्रभर चालवण्यास परवानगी दिली जाते. सनबर्न फेस्टिव्हल मध्ये रात्रभर अमली पदार्थाचे प्रचंड सेवन व वापर होत असतो. यामुळे तरूण पिढीवर प्रचंड वाईट परिणाम होतात. या वाईट संस्कृतीमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. रात्रभर तरूण मुले मुली दारू पिऊन व आमली पदार्थाचे सेवन करून दररोज धिंगाना करत फिरतात.
पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. समता, समानता व बंधूता प्रस्थापित करणारे व महाराष्ट्राला चांगली दिशा देणारे शहर आहे. पुणे जिजाऊ – शिवरायांचे, महात्मा फुले व जेधे – जवळकरांचे आणि १२ मावळा प्रांत असे पुरोगामी शहर आहे. शिक्षणाचे ‘हब’ असून सर्व धर्मांची संस्कृती जपणारे शहर आहे. याच पुण्यात हा धर्मद्रोही उत्सव चालणार नसल्याचं संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कोर्टाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करून चार स्पिकर लावून, वेळेची मर्यादा पाळून आदेश पाळले जातात. मात्र सनबर्न फेस्टिव्हलवर कोणतेही नियम व अटी पाळले जात नाहीत. बेकायदेशीर मद्य विक्री व अमली पदार्थाची विक्री केली जाते. यावर आमचा आक्षेप आहे. म्हणून मा. जिल्हाधिकारी, मा. पोलिस आयुक्त, मा. पोलिस अधिक्षक, आमली पदार्थ विरोधी पथकाने या कार्यक्रमास परवानगी देऊन नये. नियोजित सनबर्न फेस्टिव्हलला पाठीशी न घालता तो रद्द करावा. सनबर्न फेस्टिव्हल’ला संभाजी ब्रिगेड चा विरोध आहे. म्हणून प्रशासनाने बंद करावा हि विनंती. अन्यथा संभाजी ब्रिगेड हा कार्यक्रम होऊ देणार नाही. आम्ही बेकायदेशीर सनबर्न उधळून लावू असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला आहे.
COMMENTS