शेतकऱ्यांच्या आंदोलनास संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा !

शेतकऱ्यांच्या आंदोलनास संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा !

पुणे – पुरंदर तालुक्यातील विमानतळास संभाजी ब्रिगेडनं विरोध केला आहे. शेतकऱ्यांची वहिवाटीची जमीन विमानतळाच्या नावाखाली ताब्यात घेतली जात असल्यामुळे या शेतक-यांना पाठिंबा देण्याचा निर्णय संभाजी ब्रिगेडनं घेतला आहे. सरकारने विमानतळाच्या नवाखाली विकास साधायचा असेल तर तो गायरान जमिनवर साधावा. शेतकरी कसत असलेल्या जमिनीवर नको. कारण वहिवाटीची जमिन शेतकऱ्यांचा आधार आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा निर्णय घेत आहे. शेतकरी जर उध्वस्त होणार असेल तर असे विकासाचे गाजर आम्हाला नको म्हणून संभाजी ब्रिगेडचा प्रस्थावित विमानतळास विरोध असल्याचं पुण जिल्हा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

तसेच राज्य सरकारने गायरान जमिनीवर बिनधास्त विमानतळ उभे करावे. तशी जमिन बारामती तालुक्यात ४२०० एकर लागून आहे. परंतु आमदार विजय शिवतारे यांच्या बालहट्टामुळे शेतकऱ्यांना उध्वस्त करून जमिनी हडप केल्या जात असल्याचंही संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे. तसेच विमानतळात जमिनी गेलेल्या शेतक-यांवर बेरोजगारीची वेळ येते. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या नोक-यासह अनेक प्रश्नांना त्यांना तोंड द्यावे लागत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही या विमानतळाला विरोध करत असल्याचंही संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS