पुणे – संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली या राष्ट्रसंताची मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी संतापजनक बदनामी केली. परंतु ‘सरकार भिमा कोरेगाव दंगलीनंतर परत मनोहर भिडेंना पाठीशी घालत आहे व जाणिवपूर्वक त्यांना वाचवत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे.
दरम्यान संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली पेक्षा मनु श्रेष्ठ होते. ते एक पाऊल पुढे आहेत. असं वक्तव्य मनोहर भिडे यांनी केलं होतं. या महापुरूषांच्या बदनामीकारक वक्तव्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड’ने शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. परंतु पोलीस चालढकल करत आहेत. सरकारचा पोलिसांवर दबाव असण्याची शक्यता आहे. असा संशय येत असल्याचं संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे.
मनोहर भिडे ‘मोदी’ भक्त’ असल्याने सरकार भिडेंना वाचवत आहे. कारण गंभीर गुन्हे व महापुरूषांची बदनामी, घटना विरोधी वक्तव्य करून सुद्धा सरकार भिडेंना का वाचवत आहे. भिडे सरकारचे जावई आहेत का ? हे स्पष्ट करावे असंही संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS