नवी दिल्ली – मराठा समाजाच्या भावना तीव्र असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा नेत्यांशी वन टू वन चर्चा करावी अशी मागणी खासदार संभाजी राजे यांनी केली आहे. तसेच संसदेचं अधिवेशन चालू असून मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अनेक मराठा नेते राज्यात बोलत फिरत आहेत परंतु दिल्लीत कोणीही भूमिका मांडत नसल्याची टीकाही यावेळी संभाजी राजे यांनी मराठा नेत्यांवर केली आहे.
दरम्यान मराठ्यांसाठी सतत दिल्लीत भूमिका मांडणारा मी एकमेव खासदार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच औरंगाबादमध्ये मराठा तरूणाची आत्महत्या ही दुःखद घटना घडली असल्याचंही संभाजी राजे यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मी संसदेत मराठा आरक्षण मुद्दा मांडणार असल्याचंही संभाजी राजे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मराठी आंदोलनाची धग आता दिल्लीपर्यंत पोहचत असल्याचं दिसत आहे.
COMMENTS