मुंबई : आगामी पालिका निवडणुका आणि ग्रामपंचायत निवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात आता सत्ताधारी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस पक्षाने निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. यासाठी, काँग्रेसच्नेया प्रदेशाध्यपद बदलाची चर्चा रंगत आहे. यासाठी अनेक नेते शर्यतीत आहेत. प्रत्येकांना लाॅबिंग करण्यास सुरुवात केली असताना आज काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशने ही नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसकडून यासाठी एक प्रसिध्दी पत्रकही जारी करण्यात आले आहे.)
विद्ममान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर असलेली जबाबदारी कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून नवीन काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. प्रदेशाध्यक्ष पदासाठी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार राजीव सातव, नाना पटोले, सुनील केदार आणि इतर दिग्गजही शर्यतीत असल्याने नव्या वारसदाराच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आज काँग्रेसने महिला काँग्रेस पदी संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती केली आहे. सोनिया गांधी यांच्या आदेशने ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी एक प्रसिध्दी पत्रकही जारी करण्यात आलं आहे.
COMMENTS