बीड : बीडच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेले ज्येष्ट नेते जयदत्त क्षीरसागर व आमदार संदीप क्षीरसागर हे काका- पुतणे आता एकाच संघटनेत मोठ्या पदाची धुरा सांभाळणार आहे. राज्याच्या तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्या अनुपस्थित भाजपचे खासदार रामदास तडस यांनी महासंघाच्या युवा अध्यक्षपदाची धुरा आमदार संदीप क्षीरसागर यांच्या खांद्यावर दिली.
देशाता तैलिक समाज संघटन मोठं आहे. देशाच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आहेत. देशातील सर्वपक्षीय नेते या महासभेत आहेत. त्यानुसार पुणे येथे 27 डिसेंबर रोजी तैलिक महासभेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना राज्याच्या युवा अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. तैलीक महासभेचे क्षीरसागर हे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.
दरम्यान, कट्टर राजकीय वैरी असलेले क्षीरसागर काका- पुतणे आता एकाच संघटनेत मोठ्या पदाची धुरा सांभाळत असले तरी या दोघांत येणाऱ्या काळात संघटनेच्या माध्यमातून गोडवा येईल का याकडे संपूर्ण तैलिक समाजामध्ये चर्चा आहे.
निवडीनंतर आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, या पुढील काळात समाजबांधवांना सोबत घेऊन राज्यभर समाजाचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडविण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. या पदावर माझी निवड केल्याबद्दल महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष, खासदार रामदासजी तडस साहेब, महासचिव भूषणजी कर्डीले, कार्याध्यक्ष अशोकजी व्यवहारे, उपाध्यक्ष हिरालालजी चौधरी, कोषाध्यक्ष गजाननजी शेलार, सहसचिव बळवंतजी मोरघडे, सहसचिव संजीवजी शेलार, आबासाहेब बागुल यांच्यासह महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार !
COMMENTS