सांगली – भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रकाश शेंडगे यांच्या वादात आरेवाडी येथे होणारा दसरा मेळाव्याला देवस्थान समितीने परवानगी नाकारली आहे. दसरा मेळावा मेळाव्याला हार्दिक पटेल यांना बोलावले जाणार अशी भूमिका गोपीचंद पडळकर यांनी घेतली होती.तर तर धनगर समाजाच्या नेत्यांच्या शिवाय, अन्य कोणत्याही नेत्याला मेळाव्याला येऊ दिले जाणार नाही अशी भूमिका माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी घेतली होती.
या दोन नेत्यांच्या वादात आरेवाडी येथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेत आरेवाडी देवस्थान समितीने कुणालाही दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली जाणार नाही असे जाहीर केला आहे.
दरम्यान धनगर समाज बांधवांच्या समस्या सोडविल्या जाव्यात आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सर्वांनी एकत्रित यावे, मात्र धनगर समाजाच्या नेत्यांच्या आपसात वाद होणार असतील आणि त्याचा परिणाम कुठे आरेवाडी परिसरामध्ये होऊ नये म्हणून, 18 तारखेला होणाऱ्या या मेळाव्याला परवानगी दिली जाणार नाही असं आरेवाडी देवस्थान समितीचे विश्वस्त, सचिव जगन्नाथ कोळेकर यांनी जाहीर केलं आहे.
COMMENTS