सांगली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी सांगली जिल्ह्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील संबंधित लोकप्रतिनिधींना एखाद्या कार्यक्रमाला किंवा पाहणी दौरा, बैठकीला निमंत्रण पाठवणे, हा एक शिष्टाचार असतो. परंतु अशा बैठकीला प्रशासनाकडून निमंत्रण दिलं जात नसल्याची खंत आमदार सुमनताई पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांना दुजाभाव तर दिला जात नाही ना असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तसेच आज आर. आर. पाटील हयात राहिले असते, तर सांगली प्रशासनातले अधिकारी असं वागले असते का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती आढावा घेतला. त्यासाठी त्यांनी सांगतील बैठक घेतली होती, त्या बैठकीला सुमनताई अनुपस्थित राहिल्या होत्या. सुमनताई आपण बैठकीला अनुपस्थित का होता? असं विचारलं असता त्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगलीत येऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला, त्याबद्दल सुमनताई यांनी त्यांचे आभार मानले. परंतु तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला साधं निमंत्रणही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करुन दाखवली.
COMMENTS