सांगली – कुपवाडमध्ये भाजपला जोरदार धक्का बसला असून नगरसेवक धनपाल तात्या खोत आणि त्यांची पत्नी नगरसेविका सुलोचना खोत यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.सांगली आणि मिरजच्या मानाने कुपवाडचा विकास होत नाही, शिवाय आमदार गाडगीळ आणि आमदार खाडे यांचा आमदार निधी सुद्धा कुपवाडला मिळत नाही, असा आरोप करत खोत पती-पत्नीनं भाजपला रामराम ठोकला आहे.
मागील महापालिका निवडणुकीत भाजपा प्रणित स्वाभिमानी आघाडीतून खोत पती पत्नी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नगरसेवक धनपाल तात्या खोत हे जेष्ठ नगरसेवक आहेत. आतापर्यंत कुपवाड शहरावर त्यांचं वर्चस्व राहिलं आहे. 1978 पासून कुपवाड नगरपालिका आणि त्यांनतर 1998 साली सांगली महापालिका झाल्यापासून सातत्याने धनपाल खोत हे निवडून येत आहेत..
यापूर्वी ते कुपवाडचे नगराध्यक्ष होते तसेच सांगली महापालिकेचे ते स्थायी समितीचे सभापती देखील होते. तसेच कुपवाडमधील 8 वॉर्डात खोत यांचा प्रभाव आहे, त्या ठिकाणी परिणाम व्होवू शकतो असा दावा खोत यांनी केला आहे. त्यामुळे भाजपला हा जोरदार धक्का मानला जात आहे.
COMMENTS