सांगली – सांगली महापालिका निवडणुकीत सर्व अपक्षांनी आघाडी तयार केली असून एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय या उमेदवारांनी घेतला आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे बंडखोर नेत्यांनी ‘अपक्ष आघाडी’ तयारी केली असून सर्व 78 जागांसाठी पॅनल तयार करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी या अपक्षांनी केली आहे.
दरम्यान एकच चिन्ह सर्व उमेदवारांना देण्याची या अपक्ष उमेदवारांनी केली असून याबाबतची विनंती त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती आहे. तसेच ‘अपक्षांच्या आघाडीकडे 121 उमेदवारांनी संपर्क साधला असल्याची माहिती असून या ‘अपक्षांच्या आघाडी’ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं देखील पाठिंबा दिला असल्याची माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना या पक्षाना बंडखोर उमेदवारांचं आव्हान असणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS