सांगली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वासघात केला असल्याचा आरोप करत सांगलीमध्ये एका तरुणानं शोले स्टाईल आंदोलन केलं आहे.अनिल कुंभार (35) असं या तरुणाचं नाव असून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास घात केला असल्याचा आरोप केला आहे. सरकारी नोकरी मिळत नसल्याने तो शहरातील टॉवरवर चढला होता. त्याला टॉवरवरुन खाली उतरविण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कसरत केली. तब्बल तीन तासांनी अग्निशमन दलाने त्याला खाली उतरविले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सांगलीत येऊन. देशातील प्रत्येक तरुणाला रोजगार मिळेल असं आश्वासन दिले होते. मोदी पंतप्रधान होऊन चार वर्षे उलटले परंतु आपल्याला नोकरी मिळाली नसल्याचा आरोप करत त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं आहे. तसेच राज्य सरकारनेही विश्वासघात केला असल्याचं अनिल कुंभारनं म्हटलं आहे. याबाबतची बातमी दिव्य मराठीनं दिली आहे.
COMMENTS