सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाचा आज फैसला होणार आहे. महापौरपदासाठी भाजपकडून संगीता खोत आणि सविता मदने तर काँग्रेस कडून वर्षा निंबाळकर मैदानात आहेत. उपमहापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी आणि पांडुरंग कोरे यांच्यापैकी एक आणि राष्ट्रवादीकडून स्वाती पारधी यांच्यात लढत होणार आहे. बहुमतात असलेल्या भाजपने आपल्या 42 सदस्यांना गोव्याला पाठविले आहे. ते तेथून थेट मतदानासाठी दाखल होणार आहेत.
महापौरपदी संगीता खोत तर उपमहापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांची वर्णी शक्य असल्याचे बोलले जाते. आज सकाळी 11.30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत निवड सभेत याचा फैसला होणार आहे.
COMMENTS