सांगली – सांगली महापालिका क्षेत्रात पाळीव कुत्र्यांना आता वार्षिक 5 हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी 20 एप्रिलरोजी होणार्या महासभेसमोर हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. नागरिक हे, मोकाट कुत्र्यांप्रमाणेच काही पाळीव कुत्री, शहरात मोकाट सोडतात. मोकाट तसेच पाळीव कुत्री ही नागरिकांवर हल्ले करतात. त्यामुळे आता या पाळीव कुत्र्यांची नोंद आणि मालकांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
दरम्यान कोणती पाळीव आणि कोणती मोकाट कुत्री याचा फरक केला जाणार असून शहरात सुमारे 20 ते 25 हजाराहून अधिक संख्येने पाळीव कुत्री आहेत. त्यामुळे शुल्क सुरू केल्यास किमान 12 ते 25 लाख रुपये उत्पन्न मिळू शकणार असल्यालाचा महानगपालिकेनं अंदाज मांडला आहे.
COMMENTS