सांगली – राज्यातील दुष्काळाबात राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘जनावरांचा मोर्चा काढला आहे. दुष्काळग्रस्तांसाठी हे आंदोलन करण्यात आलं असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. कर्नाटकात दावणीला चारा, मात्र महाराष्ट्रात ना चारा ना चारा छावण्या अशी स्थिती आहे. चारा छावण्या सुरू करा, शेळ्या मेंड्यांच्यासाठी पण चारा छावण्या सुरू करा, कागदावर टँकर नको, खरोखर टँकर द्या, टँकरच्या लॉबी कार्यरत करा, चारा डेपो सुरू करून दावणीला चारा द्या अशा मागण्या राष़्ट्रवादीने केल्या आहेत.
दरम्यान सरकारकडून दुष्काळग्रस्तांबाबत दुर्लक्ष करण्यात आलं असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच दुष्काळाकडेही भाजपा सरकार हे पक्षीय दृष्टिकोनातून बघत आहे. भाजपाला पाठींबा दिलेल्या लोकांनाच फक्त चारा, पाणी दिला जातोय, हे चुकीचे असल्याचा आरोपही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदलन करण्याचा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.
COMMENTS