सांगली – हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचा तालुकाप्रमुख राजेश पाटीलची पक्षातून हकालपट्टी !

सांगली – हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचा तालुकाप्रमुख राजेश पाटीलची पक्षातून हकालपट्टी !

सांगली – वायफळे येथील राजेश फाळके खून प्रकरणी प्रमुख संशयित आरोपी राजेश पाटील याला स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB) च्या पथकाने कराड येथून ताब्यात घेतले आहे. तसेच राजेश पाटील याची युवक तालुकाध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांनी दिली आहे. तसेच खून प्रकरणी राष्ट्रवादीकडून निपक्ष चौकशीची करण्याची मागणी करण्यात आली असून घडलेल्या घटनेचा निषेध करत असल्याचंही भरत देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राजेश पाटील याने मातंग समाजातील राजेश फाळके या तरुणाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत उपचारादरम्यान राजेश फाळकेचा मृत्यू झाला असून तासगाव पोलीस ठाण्यात आरोपी राजेश पाटील याच्या विरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रासिटी अॅक्ट) आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीत आपल्या विरोधात गेल्यामुळे राजेश पाटीलने ही मारहाण केली असल्याची माहिती आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

 

 

COMMENTS