पुणे – सांगली आणि जळगाव महापालिकेच्या निकालावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ताधा-यांनी या निकालाने मतदारांनी विरोधकांना आपली जागा दाखवली अशी प्रतिक्रिया दिली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी लोकांच्या सरकारवर विश्वास असल्यामुळेच भाजपला हा अभूतपूर्व विजय मिळल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनीही सरकारवर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळेच यश मिळाल्याचं म्हटलं आहे. अशाच प्रतिक्रिया रावसाहेब दानवे आणि भाजपच्या नेत्यांकडून आल्या आहेत. भाजपचे समर्थकही विजयाबद्दल जनतेचे आभार मानत आहेत.
मात्र समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात नकारार्थी प्रतिक्रिया येत आहेत. एकवेळ जळगावचा निकाल अपेक्षित होता. मात्र सांगलीतला निकाल आश्चर्यकारक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. स्थानिक पातळीवरही सांगलीत काही प्रमाणात अशाच प्रतिक्रिया येत आहेत. पोलिसांचा अहवाल, स्थानिक अंदाज आणि काही सर्व्हेच्या अंदाजाने भाजप तिथे 3 नंबरवर राहील अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र निकाल बरेच वेगेळे लागले आहेत. त्यामुळे ईव्हीएमवर संशय घेतला जात आहे. मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनीही याबाबत शंका घेतली आहे. लाखोंचे मोर्चे सरकारविरूध्द निघाले. दुधाचं आंदोलन झालं. शेतकरी रस्त्यावर उतरला, तरीही ज्या महानगरपालिकेत पूर्वी सत्ताही नव्हती तिथे सत्ताधारी पक्षालाच लोकांनी निवडून दिलं.. ह्याची संगती लागत नाही.. लोकांचा रोष खोटा आहे की निवडणूक प्रक्रिया? की दोन्हीही? की दोन्हीही नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.
लाखोंचे मोर्चे सरकारविरूध्द निघाले. दुधाचं आंदोलन झालं. शेतकरी रस्त्यावर उतरला, तरीही ज्या महानगरपालिकेत पूर्वी सत्ताही नव्हती तिथे सत्ताधारी पक्षालाच लोकांनी निवडून दिलं.. ह्याची संगती लागत नाही.. लोकांचा रोष खोटा आहे की निवडणूक प्रक्रिया? की दोन्हीही? की दोन्हीही नाही?
— Anil Shidore (@anilshidore) August 4, 2018
COMMENTS