जत नगर परिषदेत भाजपला धक्का, नगराध्यक्ष काँग्रेसचा, पालिकाही त्रिशंकू !

जत नगर परिषदेत भाजपला धक्का, नगराध्यक्ष काँग्रेसचा, पालिकाही त्रिशंकू !

सांगली – संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार विलासराव जगताप आणि भाजपा मोठा धक्का बसला आहे. नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. काँग्रेसच्या शुभांगी बनेनवार यांनी भाजपच्या डॉ. रेणूका आरळी यांचा पराभव केला आहे.  काँग्रेसचा उमेदवार 128 मतांनी विजयी झाला आहे. आमदार विलासराव जगताप यांनी या निवडणुकीत चांगलाच जोर लावला होता. मात्र त्याचा त्यांना फायदा झाला नाही.

नगरसेवकांचा विचार करता कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. पालिकेत त्रिशंकू स्थिती झाली आहे. 20 जागा असलेल्या नगरपालिकेत काँग्रेसला आणि भाजपला प्रत्येकी 7 तर राष्ट्रऴादी काँग्रेसला 6 जागा मिळाल्या आहेत.  गेली तीन वेळा भाजपचा आमदार या मतादरसंघातून निवडूण आला आहे. सांगली जिल्ह्यात 1 खासदार आणि 4 आमदार असतानाही पक्षाला पराभव स्विकारावा लागला आहे.  विशेष म्हणज्ये दोन्ही काँग्रेस वेगेवेगळ्या लढूनही भाजपला त्याचा फायदा उठवता आला नाही.

COMMENTS