अखेर जयंत पाटलांनी भाजपचा ठरवून केला ‘कार्यक्रम’

अखेर जयंत पाटलांनी भाजपचा ठरवून केला ‘कार्यक्रम’

सांगली- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वाक्य प्रसिध्द आहे. ते म्हणजे आपल्या टप्यात आल्यानंतर त्याचा कार्यक्रम करायचाच, याचा प्रयत्य आज संपूर्ण महाराष्ट्राला आला. सांगली महानगर पालिकेत भाजपची एक हाती सत्ता असताना जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने महापौर निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का दिला. सत्ताधारी भाजपची पाच मतं फुटली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी यांची महापौरपदी निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या उमेदवाराची निवड झाली आहे. सत्ताधारी भाजपाला पालिकेत बंडखोरीचा मोठा फटका बसला असून हातातील सत्ता गमावली आहे.

सांगली महापालिकेत भाजपाचे संख्याबळ पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले ४१ आणि समर्थन दिलेले दोन अपक्ष असं एकूण ४३ आहे. माजी महापौर हारूण शिकलगार यांचे अकाली निधन झाल्याने काँग्रेसचे १९, तर राष्ट्रवादीचे १५ सदस्य आहेत. बहुमतासाठी ३९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक होता. महाविकास आघाडीने मोर्चे बांधणी केल्यामुळे भाजपचे सात नगरसेवका मागील दोन दिवसांपासून नाॅटरिचेबल होते. आज झालेल्या निवडीदरम्यान सत्ताधारी भाजपची पाच मतं फुटली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी यांची महापौरपदी निवड झाली आहे. महापौर निवडीवेळी भाजपाचे दोन सदस्य गैरहजर होते. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील विजयी झाले आहेत.

यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी टिका केली असून सत्तेचा गैरवापर करून नगरसेवकांची पळवापळवी केली आहे, असा महाविकास आघाडीवर हल्ला चढवला.

COMMENTS