सांगली महापालिकेचे आठ नगरसेवक राणेंच्या गळाला ?

सांगली महापालिकेचे आठ नगरसेवक राणेंच्या गळाला ?

सांगली – महापालिकेचे आठ नगरसेवक हे नारायण राणेंच्या गळाला लागले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शासकीय विश्रामगृहात होणाऱ्या बैठकी वेळी महापालिकेतील काँग्रेसचे सहा आणि अन्य पक्षातील दोन असे आठ नगरसेवक राणे यांची भेट घेणार आहेत

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे शनिवारी ९ डिसेंबर रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पक्षबांधणीसंदर्भात राणे सांगलीमध्ये बैठका घेणार आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आठ नगरसेवक या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तसेच थेट भाजपामध्ये जाऊ न शकणारे नगरसेवक हे राणेंच्या संपर्कात असून जिल्ह्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. यावरुन नारायण राणे हे काँग्रेसला पहिला धक्का सांगलीतून देणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

 

COMMENTS