अहमदनगर – भाजपला पाठिंबा दिल्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांचा खुलासा !

अहमदनगर – भाजपला पाठिंबा दिल्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांचा खुलासा !

अहमदनगर – महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना नोटीस पाठवली होती. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी खुलासा केला आहे. शिवसेनेच्या काळात नगर शहराचा विकास खुंटला आहे. सध्या राज्यात आणि देशात भाजपाची सत्ता असल्याने शहरविकासाकरीता निधी मिळण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय मी आणि पक्षाचे नगरसेवकांनी मिळून घेतला असल्याचं जगताप यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पक्षाने खुलासा मागितला असला तर योग्य तो खुलासा देईल. भाजपला हा बाहेरून पाठिंबा आहे. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार नाही. केवळ भाजपवर अंकुश ठेवणार असल्याचंही यावेळी जगताप यांनी म्हटलं आहे. तसेच छिंदम – बोराटे क्लिप प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच बाबासाहेब वाकळे यांच्याविरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही, कारण ती आमची जागा नव्हती.वडीलांचाही निर्णयाशी कोणताही संबध नसल्याचंही यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS