बीड, परळी – विधानपरिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दौंड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून आल्याने रिक्त झालेल्या जागी संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपा उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.
दरम्यान भाजपचे उमेदवार राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या निवडणुकीसाठी विधानसभेचे आमदार करणार मतदान करणार होते. मात्र संख्याबळ नसल्याने भाजपाने माघार घेतली आहे. संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि शरद पवार यांचे जुने संबंध
अलून संजय दौंड यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं आहे. संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत, मात्र शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता, त्यामुळे आता विधानपरिषदेवर त्यांना संधी मिळाली आहे.
COMMENTS