काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत जाण्याबाबत खासदार संजय काकडे यांची प्रतिक्रिया!

काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत जाण्याबाबत खासदार संजय काकडे यांची प्रतिक्रिया!

पुणे – शिवसेनी-भाजपची युती झाली नाही तर रावसाहेब दानवे दीड लाख मतांनी पडतील असा घरचा आहेर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी दिला आहे.आम्ही युतीशिवाय लोकसभा निवडणूक लढलो तर राज्यात लोकसभेच्या भाजपला चाळीस जागा मिळतील. असं वक्तव्य दानवे यांनी केलं होतं. त्यावर संजय काकडे यांनी दानवेंना घरचा आहेर दिला आहे.

दरम्यान कोणत्या आधारावर दानवेंनी हा दावा केला आहे, हे मला माहीत नाही. मी स्वतः एक सर्वेक्षण केले आहे. त्यामधून हे स्पष्ट होते की, युतीशिवाय रावसाहेब दानवे दीड लाख मतांनी पडतील. दानवेंच्या मतदारसंघात माझे चांगले संबंध असून तिथल्या लोकांशी माझे बोलणे होत असते. त्यामुळे मला तिथली परिस्थिती माहीत असून युती नाही झाली तर रावसाहेब दानवे यांचा जालन्यात पराभव निश्चित असल्याचही काकडे यांनी म्हटलं आहे.

तसेच काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा अंदाज वर्तवला जात होता परंतु आपण भाजप सोडणार नसल्याच काकडे यांनी स्पष्ट केलं आहे.

COMMENTS