शिवसेना वेगळी लढली तर 2019 ला 5 खासदार निवडून येणं मुश्कील – संजय काकडे

शिवसेना वेगळी लढली तर 2019 ला 5 खासदार निवडून येणं मुश्कील – संजय काकडे

पुणे – आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढवण्याचा निर्णय आज शिवसेनेनं घेतला आहे. परंतु शिवसेनेच्या या निर्णयावर भाजपचे खासदार संजय काकडे यांनी टीका केली आहे.  लोकसभेत शिवसनेनं जर स्वतंत्र निवडणूक लढवली तर 2019 मध्ये शिवसेनेचे पाच खासदारही निवडून येणं मुश्कील होईल असं वक्तव्य संजय काकडे यांनी केलं आहे. या निर्णयाबाबतचा फेरविचार उद्धव ठाकरे यांनी करावा असंही काकडे म्हणाले आहेत.

दरम्यान मोदी लाटेमुळे 2014 ला सेनेचे 18 खासदार निवडून आले परंतु शिवसेना वेगळी लढली तर 2019 ला 5 खासदार निवडून येणं मुश्किल आहे. असं संजय काकडे यांनी म्हटलं आहे. भाजपच मोठा भाऊ असून भाजपचे 2019 लोकसभेला 28 खासदार 165 आमदार निवडून येतील असा अंदाजही काकडे यांनी व्यक्त केला आहे. तसेच असं झालं तर शिवसेनेची ‘मनसे ‘ व्हायला वेळ लागणार नाही असंही काकडे यांनी म्हटलं आहे. तसेच  उद्धव ठाकरे असा निर्णय घेणार नाहीत असं वाटतंय परंतु हा निर्णय त्यांनी घेतला असेल तर फेरविचार करतील अशी आशा असून लोकसभेला एकत्र लढावं आणि विधानसभेला वेगळं लढावं असं माझं वैयक्तिक मत असल्याचंही संजय काकडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS