पुणे – राज्यसभेसाठी मी पक्षाकडून इच्छुक आहे, सहयोगी म्हणून नाही. माझ्या केलेल्या कामाचं बक्षीस म्हणून मला भाजप राज्यसभा देणार आहे. उदयनराजे भोसले आहेत म्हणून ते सरस होऊ शकत नाही असं वक्तव्य भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केलं आहे.तसेच काल आलेला माणूस श्रेष्ठ की मी?, मी देवेंद्र फडणवीस यांचा मोहरा आहे. उदयनराजे वंशज आहेत तर आम्हीही सुभेदार आहोत. फडणवीस हेच माझे मोदी आणि शहा आहेत, असंही संजय काकडे म्हणाले आहेत.
दरम्यान राज्यसभेसाठी काकडे यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या जागेवर संजय काकडे यांनी दावा केला आहे. संजय काकडे यांनी राजेंपेक्षा आपलीच उमेदवारी कशी सरस आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. माझ्या केलेल्या कामाचं बक्षीस म्हणून मला भाजप राज्यसभा देणार आहे. हरलेल्या व्यक्तीचं पक्षासाठी काय योगदान? हरलेल्या व्यक्तीला भाजप मंत्री करेल असं वाटत नाही. उदयनराजे भोसले आहेत म्हणून ते सरस होऊ शकत नाहीत. काल आलेला माणूस श्रेष्ठ की मी? अशी जोरदार टीकाही संजय काकडे यांनी केली आहे.
उदयनराजे पक्षात आले आणि पडले. त्यांना त्यांचा भाऊ वगळता इतर आमदारही निवडून आणता आला नाही.महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला पुण्यात मिळालेले यश पाहता पक्ष माझा विचार करेल.उदयनराजे भोसले आहेत म्हणून उमेदवार होऊ शकत नाही. तसा निकष लावला तर आम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही. काकडे हे शिवाजी महाराजांचे सुभेदार होते असंही काकडे यांनी म्हटलं आहे. काकडे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यसभा निवडणुकीपूर्वी राज्यात चांगलंच राजकीय वातावरण तापलं आहे.
COMMENTS