संजय निरुपम यांच्या घरासमोर मनसेचे आंदोलन, मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

संजय निरुपम यांच्या घरासमोर मनसेचे आंदोलन, मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मुंबई – फेरीवाल्यांच्या प्रश्नांवरून मनसे आणि काँग्रेसमधील वाद चांगलाच रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मनसे अंधेरी विधानसभा क्षेत्राचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या अंधेरी लोखंडवाला येथील घरासमोर आंदोलन केले आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांचे समर्थन केले. तसेच मनसेच्या दादागिरीविरोधात लढण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर संतप्त मनसेने संजय निरुपम यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

संजय निरुपम यांच्या घरासमोर मनसे कार्यकर्त्यांनी निरुपम विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी घरासमोर स्टॉल लाऊन त्यांनी निषेध व्यक्त केला. अनधिकृत फेरिवाल्यांची हक्काची जागा म्हणजे संजय निरुपम यांचे घर असे पोस्टर हाती घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

COMMENTS