संजय निरुपम यांची सभा मनसेने उधळली

संजय निरुपम यांची सभा मनसेने उधळली

मुंबई- घाटकोपर येथील संजय गांधी नगरमधील काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या सभेत मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. तसेच निरुपम यांची यापुढची प्रत्येक सभा उधळणार असल्याचे मनसेने म्हटले आहे.

झोपडपट्टीमधील नालाबाधितांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अचानक मनसेच्या कार्यकर्त्यांनी या सभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली. पंतनगर पोलिसांनी तातडीने हालचाल करत काही मनसैनिकांना ताब्यात घेतले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी खूर्च्या उचलून फेकल्या. तर काही स्टेजवर पोहचले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले.

मालाडमधील काही फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. या फेरीवाल्यांना निरुपम यांनी भडकवल्याचा आरोप मनसेने केला होता. याच मारहाणीच्या निषेधार्थ निरुपम यांची सभा उधळल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

COMMENTS