मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या गणेशपूजनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला महापौर बंगल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजपा नेत्या पुनम महाजन, मुंबईचे महापौर महाडेश्वर, केंद्रीय मंत्री अनंत गिते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, मनोहर जोशी, शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे, आणि ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत मात्र अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान यावेळी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये बंददाराआड चर्चा झाली असल्याची माहिती आहे. चर्चेवेळी इतर सर्वजण बाहेरच थांबले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये युती करण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
आज मुंबई येथील महापौर निवास येथे उभारल्या जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकाचे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि पत्नी सौ. रश्मी ताई, मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. pic.twitter.com/uhtz7dZEg6
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) January 23, 2019
त्यामुळे संजय राऊतांची उनुपस्थिती
दरम्यान युतीबाबत राऊत यांनी वारंवार वादग्रस्त विधान केली होती. भाजपवर त्यांनी जोरदार टीकाही केली आहे. त्यामुळेच त्यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं असल्याची चर्चा रंगली आहे.
COMMENTS