नवी दिल्ली – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 2019 लोकसभा निवडणुकीत कोणाला बहूमत मिळणार याबाबतचा अंदाज मांडला आहे. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. 2014 पेक्षा 2019 सालची लोकसभा निवडणूक वेगळी असून 2014 सारखं वातावरण आता राहिलेलं नाही त्यामुळे या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत बोलत होते.
दरम्यान महाराष्ट्रामध्ये शिवसेना महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं सूचक वक्तव्य यावेळी राऊत यांनी केलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी 5 वर्षांपर्यंत देश चालवला आहे. आता लोक त्यांना त्यांच्या कामगिरीविषयी विचारणे स्वाभाविक असल्याचंही यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे.
COMMENTS