अबू आझमी समजूतदार नेते – संजय राऊत

अबू आझमी समजूतदार नेते – संजय राऊत

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 30 वर्षांपूर्वी औरंगाबादचं नाव संभाजीनगर असे केले आहे, त्यावर फक्त सही शिक्का उमटायचा आहे, याचा पुनरुच्चार शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी करीत समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा संभाजीनगरला काही विरोध असेल असं वाटत नाही. त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला नव्हता. ते समजूतदार नेते आहेत, आम्ही त्यांच्याशी चर्चा करु, असेही राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, औरंगाबादबाबत शिवसेनेची भूमिका सर्व पक्षांना माहिती आहे. औरंगाबाद आणि संभाजीनगर नावावर आमची भूमिका स्पष्ट आहे. भाजपच्या काळातच हे नामांतर व्हायला हवे होते. ते शिवसेनेला प्रश्न का विचारतात, जे नामांतराला विरोध करतात, त्या पक्षांना का भाजप विचारत नाही? असा सवाल विचारला.

भाजप पक्षाला काय प्रॉब्लेम आहे. औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार केला, त्यावर केंद्र अजूनही निर्णय घेत नाही. भाजप नेते त्यावर का बोलत नाहीत, असा प्रतिप्रश्नच संजय राऊत यांनी विचारला.

COMMENTS