मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते अमित शाहांना प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रिपदावर काल पहिल्यांदाच भाष्य केलं होतं. आम्ही प्रत्येक सभांमध्ये सांगत होतो की युतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, तेव्हा शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही असं अमित शाह म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
मोदी सर्व सभांमध्ये फडणवीस मुख्यमंत्री होतील असं म्हणत होते, पण उद्धव ठाकरेही सांगत होते, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, तेव्हा तुम्ही का रोखलं नाही? लोकसभा निवडणुकापूर्वी का बोलला नाहीत? विधानसभा निवडणुकीनंतर बोलत आहात, आता बोलत आहेत, ही नैतिकता नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान अमित शाह म्हणतात की पंतप्रधान मोदी सभेत बोलत होते फडणवीसच मुख्यमंत्री तेव्हा शिवसेनेने आक्षेप घेतला नाही. त्याचं कारण म्हणजे आम्हाला पंतप्रधान मोदींचा अपमान करायचा नव्हता, भाजपपेक्षा जास्त आदर आम्ही मोदींचा केला, आम्हाला त्यांचा अपमान करायचा नव्हता असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
COMMENTS