मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सयमहाविकासआघाडी सरकारवर टीका केली होती. महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर
नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या असंही फडणवीस यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे.
नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2019
यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत यांनी दोन ट्विट करुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. पहिल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात की शिवसेनेच्या मुख्यमंत्री महोदयांच्या शपथग्रहण सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल माननीय देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे मनापासून धन्यवाद. हे नाते असेच राहू दे.
शिवसेना मुख्यमंत्री महोदयांच्या शपथग्रहण सोहोळ्यास आवर्जून उपस्थित राहिल्या बद्दल मा.देवेंद्रजी फडणवीस व मा.चंद्रकांत पाटील यांना मनापासून धन्यवाद.
हे नाते असेच राहू दे.— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2019
तर दुसऱ्या ट्वीटमध्ये महाराष्ट्रात विरोधी पक्षच राहणार नाही असा दावा करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते पदी निवडले गेले याबद्दल त्यांचे अभिनंदन असं राऊत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र में विरोधी पक्ष ही नहीं रहेगा, यह दावा करने वाले पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को विरोधी दल नेता चुने जाने पर हार्दिक बधाई…!
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2019
COMMENTS