राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाचं मत योग्य – संजय राऊत

राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाचं मत योग्य – संजय राऊत

पंढरपूर – राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाचं मत योग्य असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच याच पध्दतीने राम मंदिराचा प्रश्नही बरोबर असून राफेलचा प्रश्न संसदेतच सुटेल असंही राऊत यांनी म्हटलं आहे. ते पंढरपुरात बोलत होते. शिवसेनेला धार्मिक अधिष्ठान म्हणून अयोध्येनंतर पंढरपूरची निवड केली आहे.  अयोध्येतील शरयू नदीवरील महाआरतीप्रमाणे पंढरपुरात चंद्रभागेतीरी महाआरतीच नियोजन करण्यात आलं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच राज्यात आणि देशात रामराज्य शिवशाही यावी. विठ्ठल गोरगरीब कष्टक-यांचा देव असून यांच्या आशिर्वादाने निवडणूकीचे रणशिंग फुंकणार असल्याचंही यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच कर्जमाफीची तयारी केंद्र सरकार करत असेल तर हा निर्णय शिवसेनेच्या दबावाने होत असल्याचंही यावेळी राऊत म्हणाले. तसेच गडकरी आजारी होते चक्कर येऊन पडले होते. कर्जाचे आकडे पोहचले नसावे असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तसेच शिवसेना मजबूत असू २०१९मध्ये स्वबळावर सत्तेत येईल असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS