मुख्यमंत्री सच्चे असतील तर या महिलांचे भाऊ म्हणून पुढे येतील आणि राम कदम यांच्यावर कारवाई करतील – संजय राऊत

मुख्यमंत्री सच्चे असतील तर या महिलांचे भाऊ म्हणून पुढे येतील आणि राम कदम यांच्यावर कारवाई करतील – संजय राऊत

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत जोरदार टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री सच्चे असतील तर या महिलांचे भाऊ म्हणून ते पुढे येतील आणि राम कदम यांच्यावर कारवाई करतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, नरेंद्र मोदी आणि भाजपचे महिला कार्यकर्त्यांनी या विषयावर बोलणं गरजेचं आहे. सैनिकांच्या वीर पत्नीचा अपमान केल्याबद्दल भाजपचे प्रशांत परिचारक यांच्यावर ज्या प्रकारची कारवाई झाली तसाच गुन्हा राम कदम यांनी केलाय. महिलांच्याबाबत इतकं बेताल आणि अशोभनीय वक्तव्य कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने केलं नव्हतं. जे भाजपच्या व्यासपीठवरून झालं. बेटी बचाव, बेटी पढाव आणि आता बेटी भगाव हा एक नवीन नारा दिलाय. या नाऱ्याला मुख्यमंत्र्यानी पाठिंबा दिला असेल तर महाराष्ट्रातल्या रणरागिणीनी एक भूमिका घेणं गरजेचं असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान महामंडळ घेतली किंवा घेतली नाही हा फार मोठा विषय नाही. किरकोळ गोष्ट आहे.युती-आघाडीत सरकार चालवताना घेतलेली एक भूमिका असते. आमच्या वाट्याचे काही घ्यायचे नाही का ? सत्तेत आहोत ना अजून आम्ही, कार्यकर्त्यांना चार पदं मिळाली तर कुणाच्या पोटात का दुखावं ? असंही राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच बाहेरच्यांना पदे असा काही मुद्दा नाही, ज्याची पक्षाला तातडीने गरज आहे आणि त्यातुन लोकांची कामे होत असतील तर त्यातून घेतलेला हा निर्णय असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS