मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवेसना-भाजप युतीचा अखेर फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. आज सायंकाळी ५ वाजता भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री मातोश्रीवर येणार असून या बैठकीत युतीबाबत घोषणा करण्यात येणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सुरुवातीला चर्चा करुन युतीबाबत पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. तसेच जो शिवसेनेचा फॉर्म्युला आहे त्यावर चर्चा झाली असून याची घोषणा दोन पक्षाचे प्रमुख नेते संध्याकाळी करणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. नक्कीच युतीच्या दिशेने पाऊल पडलं असून अबकी बार उद्धव ठाकरे सरकार, मुख्यमंत्री सेनेचाच होणार असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS