शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणतात उदयनराजेंचा विजय कठीण !

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणतात उदयनराजेंचा विजय कठीण !

मुंबई -गेल्या काही वर्षांपासून साताऱ्यातून सहज विजय मिळवणाऱ्या उदयनराजेंसाठी यंदाची निवडणूक कठीण असल्याचं बोललं जात आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही याबाबतच भाष्य केलं आहे.लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अवघ्या 3 महिन्यांत उदयनराजेंनी राजीनामा दिला. राजीनामा देऊन त्यांनी सातारच्या जनतेवर पुन्हा निवडणूक लादली आहे. याचा निश्चित परिणाम मतदानावर होणार आहे. अवघ्या 3 महिन्यांत असं काय झालं की त्यांचं ह्रदयपरिवर्तन झालं, असा प्रश्न लोकांना पडला असेल. त्यामुळे उदयनराजेंना ही निवडणूक जिंकण कठीण असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील हे मैदानात आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांचे समर्थकही पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करीत आहेत. श्रीनिवास पाटील यांच्या समर्थकांच्या मते, विधानसभेच्या सहा मतदारसंघांपैकी कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांना एक ते सव्वा लाख मतांचे मताधिक्य मिळेल. याशिवाय, कोरेगाव आणि वाई मतदारसंघातून ही प्रत्येकी 15 ते 20 हजारांचे मताधिक्य मिळेल. सातारा विधानसभा मतदार संघात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांची ताकद वाढली असली तरी, श्रीनिवास पाटील यांचे हे सव्वा ते दीड लाखाचे मताधिक्य उदयनराजे यांना सातारा मतदारसंघातून तुटणार नाही आणि श्रीनिवास पाटील यांचा सहज विजयी होईल अस बोललं जात आहे.

COMMENTS